शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पान एकचा पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

जालना : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जालना - ...

जालना : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जालना - देऊळगावराजा रोडवर वाघ्रुळ शिवारात ही घटना घडली. तारेराव गणपत जगताप असे मयताचे नाव असून, विठ्ठल रमाजी जगताप (दोघेही रा. निवडुंगा, ता जाफराबाद) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विठ्ठल जगताप यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनधारकांचे सिग्नलकडे दुर्लक्ष

जालना : शहरातील शनि मंदिर, मुथा बिल्डिंग, मामा चौक आदी भागांतील सिग्नल सुरू करण्यात आलेले आहेत. सिग्नल सुरू असतानाही वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करून वाहने चालवत आहेत. यामुळे शहरातील शनि मंदिर, मुथा बिल्डिंग, मामा चौक आदी भागांत वाहतूक ठप्प होत आहे. सिग्लनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मासेगावात गुरूवारी यात्रा महोत्सव

जालना : घनसावंगी तालुक्यातील मासेगाव येथील तळ्यातील मारोती संस्थान येथे १३ जानेवारी रोजी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तमाशा, पाळणे व करमणुकीची साधने यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बळीराम महाराज माघाडे, पुजारी दत्ता महाराज आनंदे, विष्णू आनंदे, लिंबाजी भानुसे, अशोक भानुसे आदींनी दिली.

गोंदी ठाण्यात पोलीसपाटलांची बैठक

जालना : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीसपाटलांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला २० गावातील पोलीसपाटील हजर होते. याप्रसंगी इलियास बागवान, संपत खरात, मुंजाबा वराडे आदींची उपस्थिती होती.