शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ५० टक्के नागरिकांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्याला १ लाख ८ हजार ७२६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ...

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्याला १ लाख ८ हजार ७२६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ ५४,३८३ जणांनी पहिला तर ३८ हजार २५३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून घटली आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका असून, प्रशासनाच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय, जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यानुसार देऊळगाव राजा तालुक्यात आजपर्यंत ५४,३८३ जणांनी पहिला तर ३८ हजार २५३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तालुक्यात १,१३७ आरोग्य कर्मचारी असून, ९९८ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. फ्रंटलाईन वर्करची संख्या १९८० असून, १९४९ वर्करचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील ६१,८४८ जण असून, त्यापैकी १५,४८९ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ४३,७६१ जण असून, त्यापैकी १९,८१७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे.

जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, यासाठी ग्रामीण रुग्णालय दे.राजा व दे. मही, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा व जवळखेड अंतर्गत दररोज ५ ते ६ लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. तसेच आजपर्यंत जवळपास ४९ गावांमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे यांनी दिली.

जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करावे

कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यात उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय लसीकरणाची गती देखील वाढविण्यात आली आहे. प्रत्येक गावात लसीकरण शिबिर घेण्यात येत आहे. तालुक्यातील ५० टक्के नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. उर्वरित नागरिकांनीही लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.