भोकरदन- जाफराबाद रोडवर अपघातात एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:21 IST2018-11-28T18:18:44+5:302018-11-28T18:21:42+5:30
भोकरदन -जाफराबाद रोडवरील विरेगावजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे.

भोकरदन- जाफराबाद रोडवर अपघातात एकजण जागीच ठार
भोकरदन (जालना ) : भोकरदन -जाफराबाद रोडवरील विरेगावजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. निलेश पंडितराव नरवडे ( 30 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर दीपक छगनराव देशमुख ( दोघे वर्ष रा पिपाळगाव, रेणुकाई ) असे गंभीर असलेल्या तरुंचा नाव आहे.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास निलेश नरवडे व दिपक देशमुख हे दोघे दुचाकीवर ( क्रमांक एम एच 28 ये डब्लू 5434) भोकरदनकडून पिपाळगाव रेणुकाई या आपल्या गावाकडे प्रवास करत होते. विरेगाव जवळच्या पुलाजवळ जाफराबाद कडून भोकरदन कडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने ते दोघे गाडीसह दूर फेकले होते. यात निलेश जागीच ठार तर दिपक गंभीर जखमी झाला. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात डॉ कल्याणी बडवे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दीपकला अधिक उपचारासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी गणेश पायघन, गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.