जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:03 IST2025-08-07T19:02:18+5:302025-08-07T19:03:12+5:30

आरोपीने मुलीस धाक दाखवून गेल्या वर्षभरात तब्बल १० ते १२ वेळा अत्याचार केल्याचे तपासात उघड

Minor girl raped by threatening to kill; Accused arrested | जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर वारंवार बळजबरीने अत्याचार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी पाेस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

२१ जुलै रोजी पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी हनुमान बाबुराव गिरी हा गवत कापण्याच्या बहाण्याने घरात घुसला. त्याने मुलीवर अत्याचार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीने मुलीस धाक दाखवून गेल्या वर्षभरात तब्बल १० ते १२ वेळा अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून ५ ऑगस्ट रोजी गोंदी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे करत आहेत.

 

Web Title: Minor girl raped by threatening to kill; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.