शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

हाताला काम नसल्याने १५० कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:45 IST

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कराणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. परिसरात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून स्थलांतर थांबवावे, यावी अशी मागणी मजुरांमधून होत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात कामे राहिलेली नाही. जिरायत शेतीमधील पिकांची मागील महिन्यातच धूळधाण झाली. बागायती शेती विहिरीची पाणी पातळी एकदम कमी झाल्याने संकटामध्ये सापडली आहे. अशा परिस्थितीत मजुरांच्या हाताला शेतीशी निगडित असलेली कामे बंद पडली. काम उपलब्ध होत नसल्याने परिसरामधील जवळपास १५० कुटुंबे ऊस तोडणीसाठी तसेच शहराच्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतरित झाली असल्याचे समजले. परिसरात रोहयोची कामे सुरू नसल्याने रोजगारासाठी मजुरांवर स्थलांतराची वेळ आली आहे.महात्मा गांधी महाराष्ट्र रोजगार हमीची कामे मिळावी म्हणून गांवातील ३२० मजुरांनी कामाची मागणी केली आहे. परंतु निधीअभावी कामे करता येत नसल्याचे राणी उंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे यांनी सांगितले. या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे लक्ष घालण्याची मागणीही केली आहे.राणी उंचेगाव कृषी मंडळामध्ये रोजगार हमीची कामे प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांच्या मागणीसाठी मजुरांना तालुका कृषी कार्यलयात, कृषीसहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकाºयांच्या संमतीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. परंतु ही मंडळी अप-डाउन मध्ये व्यस्त असल्याने मजुरांची भेट होऊ शकत नाही. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये प्रशासन मजुरांच्या कामाबद्दल उदासीन धोरण राबवत असल्याने मजुरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणgovernment schemeसरकारी योजना