जालन्यात लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर सहकाऱ्याचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:50 IST2018-11-23T18:50:21+5:302018-11-23T18:50:27+5:30
शहरातील एका सूतगिरणीत काम करणाऱ्या विवाहित महिलेवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जालन्यात लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर सहकाऱ्याचा बलात्कार
जालना : शहरातील एका सूतगिरणीत काम करणाऱ्या विवाहित महिलेवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पंकज आसाराम खाडे (२३, रा. मातोश्री लॉन्सच्या पाठीमागे, जालना) असे आरोपीचे नाव असून पिडीतेच्या फिर्यादीवरुन गुरुवारी मध्यरात्री त्याच्या विरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पंकज खाडे शहरातील अंबड रोडवर असलेल्या एका सुतगिरणीत काम करतो. या ठिकाणीच पिडीताही काम करते. कामाचे ठिकाण एक असल्याने पंकज आणि पिडीतेची ओळख झाली. यातच पंकजने महिलेला मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण लग्न करू असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. यानंतर पंकजने १० महिन्यापूर्वी जालना शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीत पिडीतेवर बलात्कार केला.
यानंतर पंकजने कधी मित्राच्या रुमवर कधी हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. यामुळे पीडीत महिला ही गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वीच पीडीतेने पंकजला लग्न करण्यासंदर्भात विचारले, परंतु, पंकजने लग्न करण्यास नकार देवून, तिच्याशी बोलणे बंद केले. याप्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरुन कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेजूळ करत आहेत.