अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 04:16 PM2024-02-27T16:16:27+5:302024-02-27T16:51:27+5:30

अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर आले होते.

Manoj Jarange Patil is aggressive after the news of the removal of the pavilion from the protest site at Antarwali Sarati | अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

Manoj Jarange Antarwali Sarati ( Marathi News ) :मराठा आरक्षण आंदोलन दिवसागणिक वेगवेगळं वळण घेताना पाहायला मिळत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्षेपार्ह भाषेचाही वापर केला. त्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली असून आज सकाळीच जरांगे पाटील यांची एसआयटीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांकडून अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप हटवण्यास सुरुवात करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. याबाबतची माहिती मिळताच रुग्णालयात असणारे मनोज जरांगे हे उपचार सोडून तातडीने अंतरवालीकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी मंडप हटवण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर जरांगे हे पुन्हा रुग्णालयातच थांबले आहेत.

मंडप हटवण्याच्या हालचालींबाबत मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आक्रमक इशारा दिला आहे. "मंडप हटवत असल्याची बातमी आल्यानंतर सगळीकडेच खळबळ झाली होती. कारण गृहमंत्री वागतातच तसे. मात्र आता डीवायएसपी साहेबांनी आम्हाला मंडप हटवणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं थांबत आहे. नाही तर मी थेट अंतरवालीला निघालो होतो. दिलेला शब्द पाळा. मंडपाला, छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्यांना सुट्टी नाही," असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

दरम्यान, "मला बळजबरीने अटक करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील करोडो मराठे उपोषण करतील. सरकारने मराठ्यांचा रोष ओढावून घेऊ नये. अजूनही वेळ गेली नाही. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा," अशी मागणीही जरांगेंनी केली आहे.

का होणार जरांगेंची एसआयटी चौकशी?

मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेत मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत सखोल चौकशी करावी, असे निर्देश आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले. संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी आहे. हिंसक वक्तव्यांचे समर्थन कुणीही करीत नाही. यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी याबाबत सखोल चौकशी करावी, असं नार्वेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, "मराठा समाजाने यापूर्वी काढलेले मोर्चे शांततेने झाले, तथापि यावेळी तसे घडले नाही. कोणी वैयक्तिक टीका करणार असेल तर सभागृहाने भूमिका घेतली पाहिजे. केवळ जरांगे यांची भूमिका नाही तर त्यांचा बोलविता धनी शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व चौकशी करून सत्य बाहेर काढलं जाईल,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Manoj Jarange Patil is aggressive after the news of the removal of the pavilion from the protest site at Antarwali Sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.