शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’मध्ये ३७५ जणांचे सव्वा कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:01 IST

विविध योजनांचे अमिष दाखवून ३७४ गुंतवणूकदारांची सव्वा कोटी रूपयांची ‘मैत्रेय’ फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध योजनांचे अमिष दाखवून ३७४ गुंतवणूकदारांची सव्वा कोटी रूपयांची ‘मैत्रेय’ फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे दिवसेंदिवस गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढत असून, फसवणुकीची आकडेवारी कोटीची उड्डाणे घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आजवर केवळ दोन आरोपींना अटक झाली असून, इतर मात्र, अद्यापही फरारच आहेत.शहरासह जिल्हाभरातील सर्वसामान्यांना मैत्रेय कन्स्ट्रक्शन, मैत्रेय ग्रुप, मैत्रेय प्लॉटर्स, सुवर्ण सिध्दी, मैत्रेय सर्व्हिसेस अशा विविध कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणुकीच्या विविध योजना आणि त्यापोटी मिळणाऱ्या लाभाचे आमिष दाखविण्यात आले. साप्ताहिक, त्रैमासिक, सहामाही वार्षिक अशा पध्दतीने हप्त्यांचे संकलन करण्यात येत होते. त्यामुळे अनेकांनी काहीतरी लाभ होईल, या आशेवर थोडी- थोडी रक्कम विविध योजनांमध्ये गुंतविली. शहरासह जिल्हाभरातील शेकडो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक विविध योजनांमध्ये केली आहे. मात्र, गुंतवणुकीनंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शरद वाघमारे यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सदरबाजार पोलीस ठाण्यात ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.मैत्रेय ग्रुपच्या विविध योजनांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविण्यास सुरूवात केली होती. या प्रकरणात आजवर तब्बल ३७४ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. यात संबंधितांचे जवळपास १ कोटी १४ लाख २६ हजार ६०५ रूपये असल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंंदिवस वाढत असून, फसवणूक झालेली रक्कमही वाढणार असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आजवर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली होती. तर इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. गुंतवणूकदारांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शुभकल्याण मल्टीस्टेट को. आॅप. सोसायटीतील फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यात पाच जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. संबंधितांनी जवळपास १० लाख ४० हजार रूपयांची गुंतवणूक केली होती. शुभकल्याणच्या जालना, घनसावंगी व अंबड येथे शाखा होत्या. या प्रकरणाचा तपासही आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूकCrime Newsगुन्हेगारी