महावितरणचे दुरुस्तीचे काम करत असतात शॉक लागून मजूराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:05 IST2019-01-11T20:04:54+5:302019-01-11T20:05:20+5:30
गावठाण फिटरचे काम सुरू असतांना एका मजूराचा शॉक लागून मृत्यू झाला.

महावितरणचे दुरुस्तीचे काम करत असतात शॉक लागून मजूराचा मृत्यू
जामखेड (जालना ) : अंबड तालुक्यातील जामखेड येथे महावितरणचे गावठाण फिटरचे काम सुरू असतांना एका मजूराचा शॉक लागून मृत्यू झाला. शहादेव धोंडिराम राठोड (२३ रा. सोनक पिंपळगाव तांडा ता. अंबड) असे मयताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शहादेव महावितरणने जामखेड युनिटचे गावठाण कामा दिलेल्या एजन्सीवर मजुर म्हणुन काम करत होता. जामखेड पोलिस चौकी जवळ असलेल्या नवीन रोहित्रावर तो काम करण्यासाठी चढला. परंतू, काम करतांना रोहित्र जवळून गेलेल्या विद्युत तारांना त्याच्या हातांचा स्पर्श झाल्याने त्याला वीजेचा धक्का बसला. वीजेचा धक्का बसताच तो रोहित्रावरुन खाली कोसळला. वीजेचा धक्का तीव्र असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.