बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:15+5:302021-03-04T04:58:15+5:30

माहेर-भायगाव येथे अभिवादन कार्यक्रम अंबड : तालुक्यातील माहेर-भायगाव येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ...

Loss of farmers due to market closure | बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

माहेर-भायगाव येथे अभिवादन कार्यक्रम

अंबड : तालुक्यातील माहेर-भायगाव येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अर्जुन वाघ, उपसरपंच बाजीराव लबडे, रंजीत महेर, उमेश महेर, गणेश काकडे, अशाेक महेर, रामदास महेर यांच्यासह ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांची गैरसोय

जाफराबाद : शहरातील प्रमुख बाजारपेठेतील मुख्य मार्गावरच अनेक वाहनचालक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे इतर वाहन चालकांना कसरत करीतच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, याचा सर्वाधिक त्रास पादचारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Loss of farmers due to market closure