पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:09 IST2019-01-15T01:09:10+5:302019-01-15T01:09:27+5:30

अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Lady police employee's house broken | पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी चोरट्यांचा डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : अंबड तालुक्यातील ईश्वरनगर तांडा येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी महिला पोलीस कर्मचा-याच्या घरात डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यांसह ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पिशोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी चंद्रकला दिनेश पवार (२८ रा. ईश्वरनगर तांडा ता.अंबड) या ईश्वरनगर येथील त्यांच्या घरी झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर इतर खोल्याच्या कड्या बाहेरुन लावून फिर्यादीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला. चंद्रकला पवार यांच्या गळ््यातील मिनीगंठण चोरट्यांनी हिसकावले. यामुळे चंद्रकला पवार यांच्या गळ््याला दुखापत झाली. तसेच विविध कंपन्यांचे तीन मोबाईल, रोख रक्कम २५०० रुपयासह इतर साहित्य असा एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा लंपास केल्याची माहिती ठाणे अंमलदार राठोड यांनी दिली.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चंद्रकला पवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.पी.वाघ हे करीत आहेत.

Web Title: Lady police employee's house broken