जालना शहरात जॉगिंग आणि सायकल ट्रॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:33 IST2019-09-30T00:31:46+5:302019-09-30T00:33:13+5:30
रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने जालन्यातील पांझरा पोल परिसरात १.२ किमीचा जॉगींग आणि सायकल ट्रॅक उभारणार आहेत.

जालना शहरात जॉगिंग आणि सायकल ट्रॅक
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम जरूरी झाला आहे. यासाठी रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने जालन्यातील पांझरा पोल परिसरात १.२ किमीचा जॉगींग आणि सायकल ट्रॅक उभारणार आहेत.
या उपक्रमाचे भूमीपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी उद्योजक बनारसीदास जिंदल, कैलास लोहिया, घनशाम गोयल, फणरनर ग्रुपचे डॉ. संजय अंबेकर, रोटरी क्लब आॅफ सेंट्रलचे अध्यक्ष विवेक मोहता, ऋितेश मिश्रा, किरण बायस, दिनेश राठी यांच्यासह अनिल छाबडा, डॉ. राजीव जेठलिया, केदार मुंदडा, अरूण अग्रवाल, भरत गादिया, अभय करवा, डॉ. स्वप्नील बडदाते, आदेश मंत्री, सचिन पाटणी, आशिष करवा, विनोद अग्रवाल, विवेक मणियार, श्रीकांत दाड आदींची उपस्थिती होती.