जीपची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:36 IST2019-03-29T00:36:25+5:302019-03-29T00:36:38+5:30
स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामवाडी परिसरात घडली

जीपची दुचाकीला धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जामवाडी परिसरात घडली. हुसेन जब्बार परसूवाले (३५) असे मयत व्यक्तीचे नाव असून, अन्य एक जण जखमी आहे.
हे दुचाकीचालक देऊळगाराजावरून जालन्याकडे येत होते. तर जालना वरुन देऊळगावकडे जात असलेल्या स्कॉर्पिओ गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार हुसेन परसूवाले हा जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती तालुका जालना पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परसूवाले यांना गंभीर जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केल्याची माहिती पोलीस अंमलदार पवार यांनी दिली. जखमीवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी इसम मयत
बदनापूर : येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर बाजार समिती जवळ गुरूवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास एक ३० वर्षाच्या अनोळखी इसमास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे ठार झाला. सदर इसमास पोलीसांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले सदर प्रकरणी डॉ. ओम हरिभाऊ ढाकणे यांच्या माहितीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.