जालन्यात पोलिसांचा जुगार अड्यावर छापा; दोन गोण्या साहित्य केले जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 15:50 IST2019-02-14T15:40:37+5:302019-02-14T15:50:02+5:30

तब्बल दोन गोण्या पत्यांसह ८७ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त

Jalana raid by police on gambling; Two sacks of material were seized | जालन्यात पोलिसांचा जुगार अड्यावर छापा; दोन गोण्या साहित्य केले जप्त 

जालन्यात पोलिसांचा जुगार अड्यावर छापा; दोन गोण्या साहित्य केले जप्त 

जालना : जून्या जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एक घरात सुरु असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल दोन गोण्या पत्यांसह ८७ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शास्त्री मोहल्ला येथील गणेश रामभाऊ गोगडे यांच्या घरी जुगार अड्या सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने गोगडे यांच्या राहत्या घरी बुधवारी साडेबाराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी गणेश गोगडे (रा.शास्त्री मोहल्ला), सुरेश दादाराव लाड (इतवार गल्ली), अस्लम इब्राहिम कुरेशी ( कुचरवटा), नागेश सदाशिव कुसुंदर (शनीमंदीर परिसर), ज्ञानेश्वर नंदकिशोर  कुठाळे (कपूर गल्ली ), शशांक अंबादास चिखलिकर(गवळी मोहल्ला) आणि राजकुमार चंद्रप्रकाश कपूर (शास्त्री मोहल्ला) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

जुगार खेळतांना अनेकजण हातचलाखी करुन पत्यांवर काहीतरी खून ठेवतात. यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची भीती असते. ही टाळण्यासाठी आरोपी गणेश गोगडे यांने प्रत्येक डावासाठी नवीन पत्यांचा वापर करण्यात येत होता. यामुळे तब्बल दोन गोण्या जुगाराचे साहित्य पोलिसांनी हाती लागले.

Web Title: Jalana raid by police on gambling; Two sacks of material were seized