विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:43 PM2020-02-25T23:43:09+5:302020-02-25T23:43:20+5:30

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावाला मंगळवारी औरंगाबाद व जालना येथील संयुक्त विभागीय आरोग्य पथकाने भेट देऊन पाहणी केली

Inspection of houses in the village of Akoladev by the regional health team | विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी

विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावाला मंगळवारी औरंगाबाद व जालना येथील संयुक्त विभागीय आरोग्य पथकाने भेट देऊन पाहणी केली. घरा-घरांना भेटी देऊन डेंग्यूसदृश आजारासह इतर आजारांबाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
अकोलादेव येथे मागील महिनाभरात जवळपास सहा जणांना डेंग्यूसदृश्य तापाची लागण झाली आहे. डेंग्यूसदृश्य आजारासह इतर आजाराच्या रूग्ण संख्येत वाढ झाली होती. येथील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालयात उपचार घेणा-या रूग्णांची संख्या वाढली होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताने जागे झालेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अकोलादेव येथे ठाण मांडून नियमित तपासणी, पाहणी करून आढावा घेतला जात आहे. याच धर्तीवर मंगळवारी औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक ( हिवताप) व जिल्हा हिवताप अधिकारी जालना यांच्या संयुक्त पथकाने अकोलादेव गावाला भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी या पथकाने बाधित रूग्णांच्या घरी भेटी दिल्या. शिवाय संपूर्ण गावात साथरोग व कीटक शास्त्रीय सर्वेक्षण व पाहणी केली.
सोबतच आवश्यक त्या उपाययोजनेबाबत सूचना करण्यात आल्या. यावेळी औरंगाबाद येथील ए.आर. शेजवळ, व्ही. एस. जष्कल, जालना येथील व्ही. एस. गवळी, डी. एन. काटे, डोणगाव येथील प्रा. आरोग्य केंद्राचे व्ही. एम. मिसाळ, व्ही. बी. घायाळ, सी. एम. जमधडे, सुजाता छडीदार, दुर्गा भोरजे, इंदू ससाने, पद्मा गवळी यांच्यासह अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Web Title: Inspection of houses in the village of Akoladev by the regional health team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.