शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूपट्ट्याचे नियमबाह्य ताबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे या वाळू पट्ट्याचा लिलाव १५ डिसेंबरला झाला होता. त्यानंतर १२ जानेवारी रोजी संबंधित ...

तळणी : मंठा तालुक्यातील वझर सरकटे या वाळू पट्ट्याचा लिलाव १५ डिसेंबरला झाला होता. त्यानंतर १२ जानेवारी रोजी संबंधित गुत्तेदाराला वाळू उत्खनन करण्यासाठी महसूलकडून ताबा देण्यात आला. मात्र, ताबा देताना महसूलकडून शासन नियमांची पायमल्ली करण्यात आली असून, स्थानिकांना अंधारात ठेवून गुत्तेदाराला वाळूघाट्याचे ताबे दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वझर सरकटे २ या वाळू पट्टयातून गट क्र २०७, २१० व २१४ मधून ४०० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी व १ मीटर खोली इतक्या क्षेत्रातून ३ हजार ५३३ ब्रास वाळू उत्खननाची सरकारी किंमत ७६ लाख ५१ हजार ५४४ इतकी आहे. गुत्तेदार प्रल्हाद कारभारी दराडे (रा. झोंटीगा ता. सिंदखेडराजा बुलडाणा ) यांनी ई टेडरिंग व ई ऑक्शन किमतीच्या जास्त म्हणजे १ कोटी १९ लाख ७९ हजार ५४४ इतक्या बोलीत घेतला. संबंधित गुत्तेदाराने १०० टक्के रक्कम अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केल्यामुळे सदर वाळू पट्ट्याचा ताबा मंठा तहसीलदार सुमन मोरे, मंडळ अधिकारी पांडुरंग घुगे, तलाठी अनिल उफाड यांनी शुक्रवारी दिला. मात्र, संबंधित गुत्तेदाराला ताबा देताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली महसूलकडून करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. याबाबत तळणीचे मंडळ अधिकारी पांडुरंग घुगे यांना विचारले असता, गट क्रमांक व लांबी, रुंदी मोजून, चुना टाकून, खुना करुन वाळू पट्टा दिल्याचे ते म्हणाले. तर परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी तहसीलदारांना शासनाच्या नियमाप्रमाणे ताबा देण्याचे आदेश देण्यात येतील, असे सांगितले.

एक कोटी २१ लाखाची बोली

देवठाणा- उस्वद या वाळू पट्टयातून देवठाणा गट क्र. २५३ ते २५१, २१८ ते २११ व उस्वद गट क्र ४०४ ते ४०७, १ ते ४ मधून ५२२ मीटर लांबी, ६० मीटर रुंदी व ०.५ मीटर खोली इतक्या क्षेत्रातून ५ हजार ५३३ ब्रास वाळू उत्खननाची सरकारी किंमत १ कोटी १९ लाख ९५ हजार ५४४ रूपये इतकी आहे. तर संदिप हिरासिंग राजपूत (रा. दहिद बु. जि बुलडाणा) यांनी १ कोटी २१ लाख ९९ हजार ९९९ रूपये बोलीत घेतला आहे.