'कर्ज कसे फेडायचे'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:19 IST2022-06-29T18:18:38+5:302022-06-29T18:19:25+5:30
शेतीत उत्पन्न नसल्याने कर्ज कसे फेडायचे या तणावातून केली आत्महत्या

'कर्ज कसे फेडायचे'; आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
भोकरदन (जालना) : तालुक्यातील वाडी खुर्द येथील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. बालाजी (बाळकृष्ण) गणपत चव्हाण ( ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बालाजी चव्हाण यांची उपजीविका शेतीवर होती. शेती आणि घरखर्चासाठी बालाजीने कर्ज घेतले होते. मात्र, शेतीत उत्पन्न नसल्याने कर्ज कसे फेडायचे या तणावात बालाजी असे. आज पहाटे आर्थिक विवंचनेतच बालाजीने स्वतःच्या घरी गळफास घेतला. सकाळी नातेवाईकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी शव विच्छेदनाच्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.