कुंभारझरीत पोलिसांचा हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:56 IST2019-02-28T00:55:22+5:302019-02-28T00:56:05+5:30
टेंभुर्णी पोलीसांनी केलेल्या एका धडक कारवाईत बुधवारी सकाळी कुंभारझरी परिसरात हातभट्टीवर छापा मारून एकाला अटक केली आहे.

कुंभारझरीत पोलिसांचा हातभट्टीवर छापा
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीसांनी केलेल्या एका धडक कारवाईत बुधवारी सकाळी कुंभारझरी परिसरात हातभट्टीवर छापा मारून एकाला अटक केली आहे.
कुंभारझरी परिसरातील पूर्णा नदीच्या थडीवर हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि शंकर शिंदे यांनी आपल्या पथकासह सकाळी ८ वाजता छापा टाकला असता तेथे एकजण हातभट्टीची दारू तयार करताना आढळला. त्याच्या ताब्यातून गुळमिश्रित रसायनासह, ३० लिटर तयार दारू व इतर साहित्य मिळून १३ हजार २०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. प्रयोगशाळेसाठी आवश्यक नमुने घेवून पोलिसांनी तो माल व साहित्य तेथेच नष्ट केले. याबाबत पोकॉ. गजेंद्र भुतेकर यांच्या फियार्दीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सपोनि शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार अशोक जाधव, पोहेकॉ. अशोक वनवे, त्र्यंबक सातपुते, जाधव आदींनी केली.