शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

राजूर शिवारातील वाड्यातून नऊ लाख रूपयांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 3:02 PM

ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली.

जालना : भोकरदन तालुक्यातील राजूर गावच्या शिवारातील शेतातील वाड्यात साठा करून ठेवलेला नऊ लाख १८ हजार रूपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. यावेळी एक टेम्पो, दोन दुचाकींसह गुटखा असा एकूण १५ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भोकरदन तालुक्यातील राजूर येथील संदीप भूमकर याच्या शेतातील वाड्यात अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि. गौर व त्यांच्या सहकाºयांनी रविवारी पहाटे शेतातील वाड्यावर कारवाई केली. चौघेजण एका टेम्पोत गुटखा भरत होते. यावेळी पोलिसांनी अण्णा गजानन जगताप, अक्षय पुंडलिक मगरे (दोघे रा. राजूर ता.भोकरदन), मोहंमद तन्वीर अब्दुल खालेद मोमीन, अहमद रझा अशपाक शेख (दोघे रा. जालना) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर शेत व गुटखा संदीप दत्तात्रय भूमकर (रा.राजूर) याचा असल्याचे संबंधितांनी सांगितले.

पोलिसांनी वाहनातील व वाड्यातील असा एकूण ९ लाख १८ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. गुटख्यासह टेम्पो, दोन दुचाकी असा एकूण १५ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ सॅम्युअल कांबळे, सचिन चौधरी, पोकॉ हिरामण फलटणकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस