शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

आन्वा, वाकडी परिसरात गुटखा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

तालुकाध्यक्षपदी खलसे जलना : मनसेच्या तालुकाध्यक्षपदी कृष्णा खलसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष गजानन गिते यांनी नियुक्तीपत्र दिले. ...

तालुकाध्यक्षपदी खलसे

जलना : मनसेच्या तालुकाध्यक्षपदी कृष्णा खलसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष गजानन गिते यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी शहराध्यक्ष बाळू जाधव, तालुकाध्यक्ष सूर्यकांत कलशेट्टी, श्रीकांत राठोड, बालासाहेब मगर आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षपदी लहाने, तर उपाध्यक्षपदी मोरे

जाफराबाद : तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी बाबुराव लहाने यांची फेरनिवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी साहेबराव मोरे, फारेस चाऊस, सचिवपदी उमेश खंडेलवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव जगन्नाथ थोटे, सुरेश जंजाळ, प्रल्हाद लोखंडे, विजय कळंबे, विनायक भोपळे, संजय दीक्षित, अमोल पडघन यांच्यासह व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.

वसुलीसाठी गेलेल्या लाईनमनला मारहाण

परतूर : कृषी पंपाची वीजबिल वसुली करण्यासाठी लाईनमन दत्ता भोंगाने रविवारी रोहिणा (ता. परतूर) गावात हे गेले होते. त्यावेळी भगवान पाटोळे, नारायण पाटोळे यांनी कॅनमधील काळे ऑईल अंगावर टाकून मारहाण केल्याची तक्रार भोंगाने यांनी परतूर पोलीस ठाण्यात दिली. भोंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या अंगावरील दागिन्यांची चोरी

अंबड : शहरातील इंदुमती त्र्यंबकराव कळवटे ही महिला रविवारी सकाळी स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी जात होती. नगर परिषदेसमोर अज्ञात दोघांनी त्यांच्या अंगावर बेशुध्दीची पावडर टाकून त्यांच्या अंगावरील ३० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी काळवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

जालना : पाथ्रूड तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास पाथ्रूड ग्रामपंचायतचे माजी सदस्य संतोष राठोड, पंढरीनाथ आढे, मुख्याध्यापक नारायण माहोरे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.