शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी निर्भय होऊन जगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

जालना : आत्म-जीवन, संवाद आणि नातेसंबंध, आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण हे महत्त्वाचे आहे. २१व्या शतकात वावरताना मुलींनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ...

जालना : आत्म-जीवन, संवाद आणि नातेसंबंध, आत्मसन्मान आणि स्वसंरक्षण हे महत्त्वाचे आहे. २१व्या शतकात वावरताना मुलींनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात उन्नती करून निर्भयपणे जगावे. शिक्षणाने सक्षम होत असताना सामाजिक भान असणेही गरजेचे असते, असे प्रतिपादन संजय आंचलिया यांनी केले.

भारतीय जैन संघटना, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने सात दिवसीय ऑनलाइन-ऑफलाइन स्मार्ट गर्ल वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन संघटनेचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष संजय आंचलिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष हस्तीमल बंब, विद्यालयाचे अध्यक्ष महेंद्र गुप्ता, विनोद अग्रवाल, अ‍ॅड. अभय सेठिया, शिखरचंद लोहाडे, किरण रायबागकर, उर्मिला पिपाडा, मंजू कोटेचा व प्राचार्य डॉ. विजय नागोरी, उपप्राचार्य डॉ. विद्या पटवारी आदींची उपस्थिती होती.

संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथ्था व राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांच्या प्रेरणेने हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला शासनाने मान्यता दिली आहे. सर्व शाळांमध्ये मुलींसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. देशात ३०० प्रशिक्षकांच्या माध्यमाने शिबिरे घेऊन जवळपास २५ लाख मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलींनो आत्मविश्वासाने जगा, जग तुमच्या सन्मान करेन. आधुनिक तंत्रज्ञानाचा सदुपयोग करुन दुरुपयोग टाळावा, असे आवाहन हस्तीमल बंब यांनी केले. प्रा. डॉ. नागोरी, विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुकेश अग्रवाल, संजय अग्रवाल, गणेश अग्रवाल, श्यामसुंदर अग्रवाल, जितेंद्र गुप्ता, सुरेंद्र अग्रवाल, विनोद अग्रवाल, राजेश अग्रवाल, जगदीश अग्रवाल, नरेश अग्रवाल, मंजू मुथ्था, अंजली कुलकर्णी, डॉ. जयश्री वाडेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजू मुथ्था यांनी, तर आभार अंजू कुलकर्णी यांनी मानले.