पाय घसरून विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:42 IST2019-06-06T00:41:33+5:302019-06-06T00:42:05+5:30

शेलगाव येथील विश्वश्री संजय कान्हुले वय ९ या मुलीचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.

The girl's death by falling down in a well after falling off | पाय घसरून विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

पाय घसरून विहिरीत पडून मुलीचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील शेलगाव येथील विश्वश्री संजय कान्हुले वय ९ या मुलीचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे
तालुक्यातील शेलगाव येथील संजय कारभारी कान्हुले व त्यांचे कुटुंब दावलवाडी शिवारातील गट क्र ४३८ मध्ये घर करून राहतात़४ जूनला दुपारच्या सुमारास विश्वश्री आणि तिची मोठी बहिण भाग्यश्री या दोघी याच शेतातील विहीरीजवळ पाण्यासाठी गेल्या होत्या. या दोघींपैकी विश्वश्रीचा विहीरीत तोल गेल्याने ती विहीरीत पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या बहिणीने मदतीसाठी आरडाओरड केली मात्र परीसरात कोणीच हजर नसल्याने विश्वश्रीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ विश्वश्री ही शेलगाव येथील जि. प. शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होती. तिच्या या मृत्यूमूळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून घेतली आहे.

Web Title: The girl's death by falling down in a well after falling off