शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्याला चारशे कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:14 IST

गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा कहर : अहवाल आयुक्तांकडे सादर, सोयाबीन, मका, कपाशीचे नुकसान

जालना : आधी पाऊस पडावा म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना याच परतीच्या पावसाने डोळ्यात अश्रू आणले ओहत. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरवाला आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास चारशे कोटी रूपयांचे पिके तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पंचनाम्यांचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे सुपूर्द केला असून, त्यात सोयाबीनसह. मका, कपाशीसह द्राक्ष आणि डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.३१ आक्टोबरला संपलेल्या पावसाळ्यात केवळ ५८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यातही भोकरदन आणि जाफराबाद हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर बनली होती. परंतु दसरा ते दिवाळी आणि त्या नंतर पडलेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. सोयाबीन, मका आता बाजारात नेऊन त्याचे पैसे होतील असे स्पप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे होऊन नुकसान भरपाईचे क्षेत्र आणि आकडे निश्चित झाले आहेत. ही आकडेवारी जुन्याच निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे यात वाढ झाल्यासच खºया अर्थाने शेतकºयांना मदत मिळू शकते. सध्या आपत्तीच्या जुन्याच निकषानुसार मदतीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगण्यात आले. हे पंचनाम्यांचे आकडे तयार करतांना महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची खºया अर्थाने कसोटी लागली. दोनवेळेस बैठका घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना अहवालाची माहिती आणि एक प्रत देण्यात आली. त्यावेळी कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी रणदिवे आदींची उपस्थिती होती.सत्तासंघर्ष : मदतीकडे लक्ष लागूनजालना जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवालही शासनाकडे गेला आहे. परंतु सध्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या गंभीर प्रश्नावर लक्ष देण्यासासाठी ना सत्ताधाºयांना वेळ आहे,ना विरोधकांना त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरच काही अधिकाºयांनी शेतकºयांबद्दल तळमळ दाखवली तरच ही मदत लवकर मिळू श्कते. नसता, मदत प्रत्यक्षात कधी मिळेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :JalanaजालनाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र