पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 00:29 IST2020-03-17T00:29:12+5:302020-03-17T00:29:57+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे.

पक्ष्यांसाठी अन्न,पाण्याची सोय
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाळ्याची चाहूल लागताच चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय केली आहे. झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह खाद्यपदार्थ टाकण्यात आले आहेत.
चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्ष आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबूतर, राघू, खंड्या आदी विविध प्रकारच्या चिमण्या नेहमी येतात. उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पक्षांना अन्न, पाण्याची सोय व्हावी यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक घरटे, पाणी, अन्नासाठी भांडी तयार केली आहेत. ही घरटी, भांडी झाडावर लावण्यात आली आहेत. यात विद्यार्थी स्वत: पाणी, अन्न टाकत असून, उन्हाळ्यात पक्षांची होणारी भटकंती थांबणार आहे. विद्यार्थ्यांना शरद गायकवाड, अमरसिंह पावरा यांचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सपना सुळसुळे, प्रीती घुले, कोमल भुंबर, वनिता दौंड, वैष्णवी गोरे, आरती चौरे, प्रांजली आदमाने, प्रियंका आदमाने, सादिया सय्यद, वैष्णवी गुजर, विशाल चकवे, शुभम विटेकर, नितेश जाधव, जीवन म्हस्के, पंकज गायकवाड, ऋतिक भालेराव यांच्यासह इतर मुला- मुलींनी पुढाकार घेतला आहे.