पाच वर्षांची मुलगी अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:58 IST2018-12-06T00:58:04+5:302018-12-06T00:58:17+5:30
रस्ता ओलांडताना ट्रकने दिलेल्या धडकेत पाच वर्षीय शाळेकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे सकाळी घडली

पाच वर्षांची मुलगी अपघातात ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
मानदेऊळगाव : रस्ता ओलांडताना ट्रकने दिलेल्या धडकेत पाच वर्षीय शाळेकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. अक्षरा अरविंद शेळके असे मुलीचे नाव आहे.
जालना राजूर मार्गावर असलेल्या पीरपिंपळगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते. अक्षरा ही शाळेतून घरी येत होती. राजूर वरुन जालन्याकडे निघालेला ट्रक क्रमांक एच.आ.र. ३७ ए.५४९६ ने रस्ता ओलांडणाऱ्या अक्षराला जोराचा धक्का दिला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडून तीचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याने नागरिकांनी मार्गावर गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस कर्मचा-यासह घटनास्थळी धाव घेतली. बघ्याची गर्दी वाढल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. गर्दीचा फायदा घेत ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करुन ट्रक जप्त केला.