शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरणार; ३०० इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 12:47 AM

शनिवारी वैद्यकीय पदासाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात होती. ही रिक्त पदे भरण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने हलचाली सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत शनिवारी वैद्यकीय पदासाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली.शनिवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात २०० ते २५० डॉक्टरांची गर्दी असल्याने नेमके काय सुरू आहे, हे सामान्यांना कळाले नाही. परंतु, अधिक चौकशी केली असता हे सर्व डॉक्टर आपली कागदपत्रे घेऊन त्याची खातरजमा आणि छाननी करण्यासाठी येथे आल्याचे सांगण्यात आले. कंत्राटी तत्त्वावर ही पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्षाच्या करारावर नियुक्ती देण्यात येणार असून, यासाठी त्यांना मानधन म्हणून ५५ हजार रूपये तर बीएएमएस डॉक्टरांसाठी हेच मानधन ४५ हजार रूपये राहणार आहे. प्रथम एमबीबीएस पदवी घेतलेल्या डॉक्टरांना नियुक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर बीएएमएसचा विचार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.शनिवारी ज्या उमेदवारांची कागदपत्रे वैध आहेत, अशांना ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखत आणि रुजू होण्यासाठी सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत केली जात आहे. याचे सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड हे असून, सदस्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह समाज कल्याण अधिकारी गुठ्ठे तसेच जि.प.आरोग्य अधिका-यांचा समावेश आहे.रूग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी प्रशासनाचे पाऊलजिल्हा परिषदेंतर्गत येणाºया प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गत काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत होती. ही गैरसोय टाळण्यासाठी पदे भरण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी आरोग्य संचालकांकडे पाठविला होता.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्षात पदे भरण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून, येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयjobनोकरीHealthआरोग्य