शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने तयार केलेले शेतकरी कायदे भांडवलदारांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST

वडीगोद्री : केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी कायदे हे भांडवलदार यांच्या हिताचे असल्याने हे शेतकरी कायदे रद्द होणे गरजेचे ...

वडीगोद्री : केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी कायदे हे भांडवलदार यांच्या हिताचे असल्याने हे शेतकरी कायदे रद्द होणे गरजेचे आहे. २० सप्टेंबर, २०२० हा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस ठरला आहे. कारण या दिवशी अन्नदात्या शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारे तीन विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. ते शेतकरी कायदे केंद्र सरकारने रद्द केलेच पाहिजे, असे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने शेतकरी कायद्याच्या विरोधात शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे, डॉ.सुरेश वाघमारे, उमर दाराज खान, मंचक डोने, अनिरुद्ध येचाळे, सुभाष लवटे, संतोष कोल्हे, बप्पासाहेब काळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पाटील म्हणाले, या जाचक शेतकरी कायद्याबद्दल कोणीही जास्त बोलायला तयार नाही. कारण जर कोणी विरोध केला, तर त्याला ईडीची भीती दाखविली जात आहे. एका अर्थाने देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे. राज्यातही जे पक्ष आतापर्यंत विरोधात लढले ते आता सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे राजकीय नैतिकता ही रसातळाला गेलेली दिसून येत आहे. फक्त सत्तेत राहण्याच्या हव्यासापोटी जनतेच्या भावनांशी राजकीय पक्ष खेळत आहेत. देशातील ही सर्व परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे. आम्ही कोणत्याही ईडीला घाबरत नाही. आमची काय चौकशी लावायची असेल ती लावावी, परंतु या केंद्र सरकारच्या जाचक शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत राहणार. आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा, शेतकरी किंमत हमी व कृषिसेवा करार कायदा, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा ही सर्व कायदे अंबानी-आदानी व सहकारी यांच्या आर्थिक हितासाठी तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही हित समाविष्ट नाही. यावेळी अनिल गोएकर, विजय खूपसे, पंढरी जायनुरे, शशिकांत मतकर, शेखर बंगाळे, मारोती राठोड, यशवंत लवटे, अखिल देशमुख, चंद्रकांत हजारे, गणेश छेत्रे, राजेंद्र सुळ, ॲड.डी. आर. धैर्य, ॲड. माधव माडगे, विशाल कांबळे, दिग्विजय कांबळे, नाजम शेख, इस्माईल फुलारी आदी उपस्थित होते.