शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतले सव्वासात कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST

जालना : जिल्ह्यातील १११ जणांनी सावकारीचे अधिकृत परवाने घेतले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतर व्यावसायिकांनी या अधिकृत सावकारांकडून तब्बल ७ ...

जालना : जिल्ह्यातील १११ जणांनी सावकारीचे अधिकृत परवाने घेतले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतर व्यावसायिकांनी या अधिकृत सावकारांकडून तब्बल ७ कोटी ३३ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद आहे.

जालना जिल्ह्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात चालते. शेतकऱ्यांच्या शेतीचे खरेदीखत करून घेणे, कोऱ्या धनादेशावर स्वाक्षऱ्या घेणे, इसार पावती करून घेणे, ई-करार करून घेऊन शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. अनेक सावकार व्याजासह पैसे परत मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना जमिनी परत करीत नसल्याच्या तक्रारी जिल्हा निबंधक (सावकारी) यांच्याकडे दाखल होतात. अधिकृत सावकारांकडून होणारी लूट पाहता काहींनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात १११ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांकडून जिल्ह्यातील १३ हजार १४८ शेतकरी, व्यावसायिकांनी तब्बल ७ कोटी ३३ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. यात जालना शहर व तालुक्यात सर्वाधिक ६३ सावकार आहेत. त्यांच्याकडून १२ हजार ६४२ जणांनी ६ कोटी ६७ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे.

अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी

अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगर तारणासाठी ------------१२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणासाठी १८टक्के व्याजदर आकारला जातो.

वर्षात ८८ आत्महत्या

नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील ८८ शेतकऱ्यांनी या वर्षात आत्महत्या केली आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी सावकारांच्या दारात उभे राहत आहेत. असंख्य अनधिकृत सावकार मनमानी पद्धतीने व्याज आकारून किंवा जमीन नावे करून घेत कर्ज देत आहेत.

अनधिकृत सावकारी

जिल्ह्यात अनधिकृत सावकारी करणाऱ्यांची कमी नाही. आजवर जिल्ह्यातील १२ सावकारांविरुद्ध ७ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत, तर शेतकऱ्यांच्या येणाऱ्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक (सावकारी) विभागाकडून सावकारांच्या घर, दुकानांवरही धडक कारवाईची मोहीम राबिवली जात आहे.

जिल्ह्यातील अधिकृत सावकार

१११

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात मृत्यूला कवटाळले

८८