भरधाव कार दुचाकीला उडवून हॉटेलमध्ये घुसली... !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 01:05 IST2019-12-11T01:05:42+5:302019-12-11T01:05:59+5:30

औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील जामखेड फाट्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली.

Exhausted car rides a hotel ... | भरधाव कार दुचाकीला उडवून हॉटेलमध्ये घुसली... !

भरधाव कार दुचाकीला उडवून हॉटेलमध्ये घुसली... !

लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील जामखेड फाट्यावर कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, यात चार जण जखमी झाले आहेत.
मंगळवारी दुपारी ज्ञानदेव दोरके, सुरेश दोरके व मीरा संतोष मोरे (सर्व रा. डावरवाडी) हे दुचाकी (क्र. एम. एच. २१ बीके. ९४२८) वरून पाचोडवरून जामखेडकडे येत होते. जामखेड फाट्यावर त्यांची दुचाकी येताच दुचाकीला औरंगाबादहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कार (एम. एच. २०. ईजे. बीके. ६८३७) ने जोराची धडक दिली. यात दुचाकी वीस फूट अंतरावर जाऊन पडली. तर कार एका हॉटेलमध्ये घुसली. परंतु, हॉटेलमधील गॅस शेगडी बंद असल्याने अनुचित प्रकार टळला.
यात दुचाकीवरील तीन जण व हॉटेलमधील गफ्फूर सांडू शेख हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. मात्र, दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कार चालकाचे नाव समजले नाही. टोल नाक्यावरील कर्मचारी डॉ. महेश जाधव, संजय यदमळ, बाळू चित्रे, विनोद छत्रे, गजानन काळे, आत्माराम गाडेकर, रवि गाडे यांनी जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

Web Title: Exhausted car rides a hotel ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.