शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

बहुमतानंतरही चार ग्रामपंचायती जाणार विरोधकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST

भोकरदन : ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळविलेले असतानाही चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद विरोधकांच्या ताब्यात जाणार आहे. आरक्षण सोडतीत सरपंचपद विरोधी गटाकडे ...

भोकरदन : ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळविलेले असतानाही चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद विरोधकांच्या ताब्यात जाणार आहे. आरक्षण सोडतीत सरपंचपद विरोधी गटाकडे गेल्याने संबंधितांना राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.

भोकरदन तालुक्यातील सरपंचपदाच्या जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये चार ग्रामपंचतींमध्ये निवडणुकीत बहुमत मिळूनही विरोधी पॅनलचा सरपंच होणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या पिंपळगाव सुतार या ग्रामपंचायतीवर तब्बल २५ वर्षांनंतर भाजपचा सरपंच विराजमान होऊन भाजपचा झेंडा फडकणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत राष्ट्रवादीचे आहे. मात्र, मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण निघाले असून, ही जागा भाजपच्या शारदा मुकुंद मनोहर यांनी जिंकली आहे. त्यामुळे बहुमत मिळवूनही या ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे सोमनाथ हराळ यांच्या समर्थकांची सरपंचपदी वर्णी लागणार आहे. अशीच परिस्थिती पिंपळगाव शेरमुलकी गावातही झाली आहे. या ठिकाणी बहुमत राष्ट्रवादीचे आहे. मात्र, आरक्षण मागासवर्गीय प्रवर्गाला सुटले आहे. ही जागा भाजपच्या सुखदेव तांबे यांनी जिंकली आहे. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बहुमत येऊनही सत्तेपासून दूर राहणार आहे, तर नळणी (खु.) येथे भाजपचे बहुमत आहे. मात्र, मागासवर्गीय आरक्षणाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतीक्षा विलास सरोदे यांनी जिंकली आहे. वाडी (बु.) येथेही ओबीसीच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचा सरपंच होणार आहे.

नवख्या उमेदवारांना मतदारांचे प्राधान्य

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी अनेक मातब्बरांना धूळ चारली असून, नवख्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये बरंजळा साबळे, सिरजगाव मंडम या गावात मातब्बराची धोबीपछाड झाली, तर आमदार संतोष दानवे यांच्या केदारखेडा व माळेगाव येथील तर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या सासऱ्यांच्या हिसोडा व आव्हाना येथील जवळच्या नातेवाइकांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.