वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:59 IST2023-01-21T14:58:42+5:302023-01-21T14:59:19+5:30

मृतदेहाजवळ वन्य प्राण्याचे ठसे आढळून आले आहेत, मात्र कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही

Elderly dies in wild animal attack; A dead body was found in the field | वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; शेतात आढळला मृतदेह

- फकिरा देशमुख
भोकरदन:
तालुक्यातील चोरहाळा शिवारात एका वृद्ध महिलेचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. लंकाबाई सुखलाल राऊत ( 80, रा वालसा ह मु  बाभूळगाव ) असे मृताचे नाव आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, लंकाबाई राऊत या चोऱ्हाळा शिवारातील शेतात  परिवारासह राहतात. शुक्रवारी रात्री विहिरीजवळ त्यांच्यावर अज्ञात वन्य प्राण्याने हल्ला केला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी हा प्रकार लक्षात आला. 

माहिती मिळताच भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लंकाबाई राऊत यांचा छातीपासून वरचा पूर्ण भाग फाडल्याचे दिसत आहे. तसेच त्या ठिकाणी वन्यप्रान्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत. मात्र, हा हल्ला बिबट्याने केला की अन्य वन्यप्राण्याने केला हे अद्याप स्पष झाले नाही, अशी माहिती जोगदंड यांनी दिली. सांगितले.

Web Title: Elderly dies in wild animal attack; A dead body was found in the field