शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:38 IST

ही घटना  रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात घडली. 

पवन पवार -

वडीगोद्री - भरधाव वेगाने शिर्डीकडे जाणाऱ्या इरटीगा कारचालकाला डुलकी लागल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रकला धडकली. या अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना  रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव शिवारात घडली. 

या अपघातात पी रमेश पी कृष्णा मूर्ती वय ४५ रा. मदनपेठ, मलकपेठ हैद्राबाद असे अपघातातील मृताचे नाव असून श्रीराम दहीता वय २५ रा. हैदराबाद हा जखमी झाला आहे. या अपघातात कार चक्काचूर झाली आहे.

इरटीगा कार क्रमांक एपी ११ एटी ०४५५ हैद्राबादहून शिर्डी कडे भरधाव वेगाने जात असताना कार चालक याला डूकली लागली अन् नियंत्रण सुटले अन् कार थेट दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बीड कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे ३२ जीई ०२९१ ला जाऊन धडकली हा अपघात एवढा भिषण होता की कार चा चक्का चूर झाला असून  एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी महामार्ग १०३३ रुग्णवाहिका व मदतनीस यांनी येऊन पर प्रांतीयास दरवाजा टांबी व लोखंडी पहार ने तोडून बाहेर काढले व वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला.

अपघात झाल्यानंतर धुळे सोलापूर महामार्गावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करून वाहने बाजूला केली. या महामार्गावर अपघाताचे सत्र चालूच आहे.

टॅग्स :AccidentअपघातcarकारDeathमृत्यू