'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:25 IST2026-02-06T17:24:13+5:302026-02-06T17:25:01+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला.

'Do a narco test of Dhananjay Munde, Amol Khune with me!'; Manoj Jarange demands from the police | 'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

'माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणेची नार्को टेस्ट करा!'; मनोज जरांगे यांची पोलिसांकडे मागणी

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या घातपाताच्या कथित कटप्रकरणी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयित आरोपी अमोल खुणे याने स्वतःहून नार्को टेस्टची मागणी केली असेल, तर त्याचा अर्ज तत्काळ न्यायालयात सादर करावा. माझ्यासह धनंजय मुंडे, अमोल खुणे आणि इतर अशा पाच जणांची नार्को टेस्ट करून या प्रकरणातील सत्य काय आहे ते पुढे आणावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी जालना पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

गुरुवारी दुपारी मनोज जरांगे-पाटील यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. अमोल खुणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडेंनीच माझ्या घातपाताचा कट रचला आहे, असा दावा जरांगे यांनी केला आहे. माझ्या जीवाला धोका असल्याचे मान्य करतानाच जरांगे यांनी माझी सुरक्षा व्यवस्था काढून घ्या, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

कॉल रेकॉर्डिंगवरून थेट आव्हान
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगविषयी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिला. मला मारायला ये, तुझे बोटंही परत जाऊ देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले. कट रचण्याच्या या प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अमोल खुणेचा नार्को टेस्टचा अर्ज पोलिसांनी विनाविलंब न्यायालयात सादर करावा, यावर मनोज जरांगे ठाम आहेत.

Web Title : जरांगे ने मुंडे, खुणे और स्वयं के लिए नार्को टेस्ट की मांग की।

Web Summary : मनोज जरांगे ने कथित हत्या की साजिश के संबंध में धनंजय मुंडे, अमोल खुणे और खुद के लिए नार्को टेस्ट की मांग की। उन्होंने मुंडे पर साजिश रचने का आरोप लगाया और उन्हें सीधे चुनौती दी, साथ ही सभी आरोपियों की गहन जांच और जमानत रद्द करने की मांग की।

Web Title : Jarange demands narco test for himself, Munde, and Khune.

Web Summary : Manoj Jarange demands a narco test for himself, Dhananjay Munde, Amol Khune, and others regarding an alleged assassination plot. He accuses Munde of orchestrating the plot and challenges him directly, demanding thorough investigation and cancellation of bail for all involved.