भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:34 IST2019-02-04T13:23:06+5:302019-02-04T13:34:14+5:30

या दरम्यान छोट्याशा चुलीत चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने गोठ्यातील चाऱ्याने पेट घेतला.

The death of three children in a fire in the game of Bhatukali | भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू 

भातुकलीचा खेळ खेळताना लागलेल्या आगीत तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू 

भोकरदन (जालना ) :भातुकलीचा खेळ खेळत असताना लावलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने यात होरपळून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना तालुक्यातील क्षीरसागर या गावात आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. वेदांत विष्णू मव्हारे (८), सार्थक मारुती कोलते ( ६), संजीवनी गजानन मव्हारे (३ ) अशी मृत मुलांची नावे आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की, क्षीरसागर या गावा लगत विष्णू  मव्हारे यांचा जनावरांचा गोठा आहे. या ठिकाणी आज सकाळी वेदांत विष्णू मव्हारे (८), सार्थक मारुती कोलते ( ६), संजीवनी गजानन मव्हारे (३ ) ही मुले भातुकलीचा खेळ खेळत होती. या दरम्यान छोट्याशा चुलीत चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने गोठ्यातील चाऱ्याने पेट घेतला. यामुळे घाबरून या मुलांनी शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. मात्र आग वाढत जाऊन तिने या शेडला कवेत घेतले. शेडला एक दरवाजा होता आणि त्या मार्गातच आग लागल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. यातच तिन्ही चिमुकली होरपळून मरण पावली. 

Web Title: The death of three children in a fire in the game of Bhatukali