धोकादायक विद्युत डीपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:39+5:302021-02-08T04:26:39+5:30

कारवाईची मागणी जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून कायदा ...

Dangerous electrical DP | धोकादायक विद्युत डीपी

धोकादायक विद्युत डीपी

कारवाईची मागणी

जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारूविक्री जोमात सुरू आहे. दारूमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

यात्रेला परवानगी द्या

परतूर : येथील साईनाथ यात्रा भरविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी अध्यक्ष गंगाधर पवार, माधव कदम, वैजनाथ बागल, बाबुराव काजळे आदींची उपस्थिती होती.

तुरीचे दर सात हजारांवर

जालना : शहरातील मोंढ्यात तुरीची आवक चांगलीच वाढली आहे. पांढऱ्या तुरीचे दर कमाल ७ हजार १०० तर किमान ५ हजार ४०० रुपये आहेत. शनिवारी पांढऱ्या तुरीची आवक ९ हजार ४५० क्विंटल झाल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छतेची मागणी

सेवली : जालना तालुक्यातील सेवली गावांतर्गत नाल्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, साथरोगाचा धोका उद्भवत आहे. प्रशासनाने गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Dangerous electrical DP