कापसाच्या ट्रकला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:29 AM2019-04-12T00:29:15+5:302019-04-12T00:29:44+5:30

भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार फाट्याजवळ गुरूवारी सायंकाळी कापसाच्या ट्रकला आग लागली. यात लाखो रूपयांचा कापूस जळाला

Cotton trunk fire; Loss of millions | कापसाच्या ट्रकला आग; लाखोंचे नुकसान

कापसाच्या ट्रकला आग; लाखोंचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार फाट्याजवळ गुरूवारी सायंकाळी कापसाच्या ट्रकला आग लागली. यात लाखो रूपयांचा कापूस जळाला असून ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परभणी, मानवत येथील कापूस व्यापाऱ्याचा हा ट्रक होता. गुरूवारी १३० क्विंटल कापसाने भरलेला ट्रक (क्र. जीजे ३ एटी. ०००२) हा मानवत, परभणी येथून गुजरातकडे जात होता. दरम्यान, कठोरा बाजार येथे ट्रक येताच रस्त्यावरील विजेच्या तारांपेक्षा ट्रकची उंची अधिक असल्याने शॉर्ट सर्किटने ट्रकधील कापसाला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून पळ काढला. यानंतर अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला परंतु, तोपर्यंत ४० क्विंटल कापूस जळून मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

Web Title: Cotton trunk fire; Loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.