coronavirus : जालन्यात कोरोना ४०० पार; आज नऊ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 10:02 IST2020-06-25T10:02:07+5:302020-06-25T10:02:33+5:30

कोरोनामुळे जिल्ह्यातील १२ रूग्णांचा बळी गेला आहे.

coronavirus: Corona crosses 400 in Jalna; An increase of nine patients today | coronavirus : जालन्यात कोरोना ४०० पार; आज नऊ रुग्णांची वाढ

coronavirus : जालन्यात कोरोना ४०० पार; आज नऊ रुग्णांची वाढ

जालना : गुरूवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार नवीन नऊ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ४०७ वर गेली आहे.

रूग्णालय प्रशासनाकडून बुधवारी ६१ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील नऊ जणांचा कोरोना अहवाल गुरूवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. तर ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या ४०७ वर गेली असून, यशस्वी उपचारानंतर २७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे जिल्ह्यातील १२ रूग्णांचा बळी गेला आहे.

Web Title: coronavirus: Corona crosses 400 in Jalna; An increase of nine patients today