शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे हळदी - कुंकू कार्यक्रमावरही संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

टेंभुर्णी : यावर्षी हळदी - कुंकू कार्यक्रमावरही कोरोनामुळे संक्रांत आली असून, एरवी संक्रातीनंतर महिनाभर चालणारा हळदी- कुंकू कार्यक्रम यावर्षी ...

टेंभुर्णी : यावर्षी हळदी - कुंकू कार्यक्रमावरही कोरोनामुळे संक्रांत आली असून, एरवी संक्रातीनंतर महिनाभर चालणारा हळदी- कुंकू कार्यक्रम यावर्षी सुना-सुना दिसत आहे. ग्रामीण भागातील महिलाही हळदी - कुंकू कार्यक्रम मोजक्या जणींच्या उपस्थितीत उरकताना दिसत आहेत.

हळदी - कुंकू कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात असताना टेंभुर्णीसारख्या १५ हजार लोकसंख्येच्या गावात अद्याप एकही मोठा कार्यक्रम पार पडल्याचे कुठे दिसून आले नाही. एरवी हळदी - कुंकू म्हटले की, महिलांसाठी एक पर्वणी असते. फराळपाणी, उखाणे, वाण वाटणे आदी भरगच्च कार्यक्रम महिनाभर चालत असतात. आज या गल्लीत, तर उद्या त्या गल्लीत यानिमित्ताने जणू ठिकठिकाणी महिला मेळावेच आयोजित केले जातात. त्यातच मागील काही वर्षांपासून गल्लीतील महिला एकत्र येऊन सामूहिक हळदी - कुंकू कार्यक्रम ठेवण्याची क्रेझ वाढल्याने या कार्यक्रमांंना मोठे स्वरूप आले होते. यावर्षी मात्र शहरांपासून खेड्यांपर्यंत हळदी - कुंकू कार्यक्रम थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे.

येथील शिक्षक कॉलनीत दरवर्षी होणारा हळदी -कुंकू कार्यक्रमही यावेळी साध्या पद्धतीने रविवारी पार पडला. इतर महिलांना निमंत्रण न देता कॉलनीत महिलांनीच या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी कॉलनीतील शिक्षिका सुनीता खलसे यांनी सर्व महिलांना माॅ जिजाऊंंचे चरित्र भेट देऊन आगळेवेगळे वाण दिले. यावेळी पुष्पा म्हस्के, सुखदा काळे, सुनीता बुगदाने, उषा सोळंके, उषा चेके, सुनीता खलसे, संगीता सावसक्के, शोभा ढवळे, अनिता इंगळे, आशा राजुरे, जया उबरहंडे, सुभद्रा जगधने, सीमा पुराणे, शोभा उखर्डे, द्रोपदा वाघमारे, रेणुका शिंदे, शिवणकर आदिंची उपस्थिती होती.

फोटो- टेंभुर्णी येथील शिक्षक कॉलनीतील महिलांनी मोजक्याच जणींच्या उपस्थितीत हळदी - कुंकू कार्यक्रम घेतला. यावेळी सर्व महिलांना माॅ जिजाऊ चरित्राचे पुस्तक वाण म्हणून भेट देण्यात आले.