शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 01:14 IST

ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

पवन पवार -

वडीगोद्री (जालना ) : अंतरवली सराटी येथे भाजप नेते खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा, अशी आमची भावना असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.

चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वीही मी जरांगे यांची भेट घेतली होती. जरांगे यांच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मधल्या काळात आचार संहिता असल्याने काही प्रश्न सुटले नाही. यामुळे मी पुन्हा आज जरांगे यांच्या भेटीला आलो आहे. यावेळी, गंभीर गुन्हे वगळता, इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाली. हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण, अशी देखील मागणी आहे, यावरही यावेळी चर्चा झाली.

फोनवर मंत्री शंभु राजे देसाई आणि जरांगे यांचे बोलणे झाले आहे. जेवढ्या लवकर हा विषय संपेल तेवढे चांगला आहे. शासन स्तरावर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लागले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आजची भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे. शासन आणि जरांगे यांच्यात मी समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, अशोक चव्हाण हे सरकार, समाज की माध्यम म्हणून आले? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

सगे सोयरेची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करावी. आजची चर्चा सविस्तर झाली असून, त्यांच्या लक्षात आले आहे की, ओबीसींना धक्का लागणार नाही. मुलींचं मोफत शिक्षण सरकारने केलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आमची लढाई बंद नाही, 288 आमदार पाडायचे की, लढवायचे हे सुरू आहे. आम्ही सरकारचे काम करत आहोत. शांतता राज्यात राहावी हे सरकारचं काम आहे, आणि हेच आम्ही करत आहोत. आम्ही शांतता रॅली काढत आहोत. आमच आरक्षण आम्हाला द्या, मला राजकारणात ढकलू नका. नाही दिलं तर, पुढचं सांगत नाही,  असेही जरांगे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAshok Chavanअशोक चव्हाण