शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

अंबड नगरपालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन ...

अंबड : देशपातळीवर काँग्रेस व भाजप यांच्यातून विस्तव जात नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या संसदेत जोरदार रणकंदन सुरू आहे. असे असतानाही सोमवारी अंबड नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेसचा उमेदवार उपनगराध्यक्षपदी विराजमान झाला.

अंबड पालिकेतील काँग्रेसचे नेते केदार बाबूराव कुलकर्णी यांनी ६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी सोमवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल व सहायक अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे शेख जाकेर शेख मकबूल व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आसमाँ परवीन अफरोज पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात शेख जाकेर शेख मकबूल यांना १२, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना ५ मते मिळाली. अंबड नगरपालिकेत सध्या एकूण १९ नगरसेवक असून, त्यामध्ये भाजपचे ६, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व शिवसेनेचा १ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचा आक्षेप शासनदरबारी दाखल असल्यामुळे भाजपच्या दोन नगरसेवकांना मतदान करण्यास मनाई करण्यात आली होती, तर शिवसेनेच्या संजीवनी हनुमान धांडे या मतदानास गैरहजर राहिल्या. १६ नगरसेवक व १ नगराध्यक्ष असे एकूण १७ जणांनी मतदान केले. काँग्रेसच्या शेख जाकेर शेख मकबूल यांना काँग्रेसचे ५, भाजपचे ४, राष्ट्रीय समाज पक्षाचे २ व भाजपच्या नगराध्यक्षा संगीता देविदास कुचे यांचे १ अशी एकूण १२ मते मिळाली, तर आसमाँ परवीन अफरोज पठाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांची मते मिळाली.

निवडणुकीनंतर वातावरण तापले

निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवप्रसाद चांगले यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसने आघाडी धर्माचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांची साथ सोडून भाजपशी अभद्र आघाडी केल्याचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.