रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:28 IST2019-09-20T00:28:00+5:302019-09-20T00:28:15+5:30
रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले.

रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याचे केले संकलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंगारिका चतुर्थीनिमित्त जालना शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक राजूर येथे जातात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. दरम्यान, रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले.
यावेळी स्वच्छता अभियान द्वार उभारुन भाविकांना राजुरेश्वर दर्शन यात्रेच्या सुरुवातीस स्वच्छता पाळण्याची जाणीव करुन देण्यात आली.
या द्वाराचे उद्घाटन जेईएस् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास १०० रु. सोशल क्लबचे अनेक सदस्य तसेच राजुरेश्वराच्या दर्शनाला जाणा-या अनेक भाविकांची उपस्थिती होती.
मंगळवारी सकाळी सहा वाजेपासूनच रोटरी रेनबोच्या सदस्यांनी आयुष बाल रुग्णालय ते घाणेवाडीपर्यंतच संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी साफ केला. या उपक्रमात त्यांना सोशल क्लब, योगा गु्रप व नगरपालिका, जालना स्वच्छता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ. आरती मंत्री, डॉ. अंजली सारस्वत, पर्यावरण संचालक डॉ. संजय रुईखेडकर, राजेंद्र अग्रवाल यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. यावेळी क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.