शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅन्सर इज डेथ सेंटेंस्’ संकल्पना बदलायचीय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:39 IST

कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कआज वेगवेगळ्या कारणांमुळे असाध्य असा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार जडल्यानंतर प्रत्येकजण हवालदिल होतो. आता आपल्या आयुष्यात काही रस नाही, असे समजून तो निराशेच्या गर्तेत जातो. परंतु, अ‍ॅलोपॅथी सोबतच आयुर्वेदातही कर्करोगावर अनेक खात्रीशीर उपाय सांगितले आहेत. अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या दुर्धर आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला.आयुर्वेद आणि कॅन्सरचा कसा संबंध?आज जरी कर्करोग हा आपल्याला अ‍ॅलोपॅथीच्या माध्यमातून अलीकडे कळत आहे. परंतु, अंदाजे पाच हजार वर्षांपूर्वी वैद्यराज सुश्रूत यांनी मानवाला ‘अबूर्द’ हा आजार म्हणजेच कर्करोग म्हणून संबोधले होते. ही व्याधी असाध्य म्हणून त्याच वेळी सांगितले होते. परंतु, व्याधी असाध्य असली तरी आयुर्वेदात त्या काळातही यावर अनेक खात्रीशीर उपाय होते.इंटिग्रेटेड अ‍ॅप्रोच महत्त्वाचा?कर्करोगावर ज्या प्रमाणे आज रेडिएशन, केमो थेरपी, शस्त्रक्रिया हे तीन उपाय प्रभावी आहेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही शल्य, क्षार आणि अग्नीकर्म असे उपाय सांगितले आहेत. त्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक औषधशास्त्राची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य आहे. त्यामुळे हा आजार झालेल्या रूग्णांनी खचून जाऊ नये. आता या आजारावर अत्याधुनिक औषधींसह आयुर्वेदिक औषधीही प्रभावी ठरत आहेत.आयुर्वेदात काम करणारी आमची ही तिसरी पिढी आहे. वडील, चुलते आणि मी तसेच बहीण याच क्षेत्रात रूग्णसेवा करीत आहोत. रूग्णांना सेवा देताना त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसलेली तरी देखील आम्ही सेवाधर्म या माध्यमातून त्यांना शक्य ती मदत करत आहोत. भविष्यातही ही परंपरा जपण्याचे प्रयत्न करू, असे ते म्हणाले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनकर्नाटक मधील बेळगाव येथील के.एल.ई. विद्यापीठाने कर्करोगावर आयुर्वेदात संशोधन करण्यासाठी फेलोशिप सुरू केली होती. यामध्ये प्रॅक्टीकल, थेअरी तसेच अ‍ॅलोपॅथी तज्ज्ञ आणि आयुर्वेदातील तज्ज्ञ यांच्याकडे जाऊन इंटीग्रेटेड अभ्यास सुरू केला होता. त्यात आपण देशातून फेलोशिपमध्ये अव्वल आलो आहोत.

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयmedicinesऔषधंscienceविज्ञान