शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात गुणात्मक वाढीचे आव्हान कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:11 IST

शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली आहे. असे असले तरी गुणात्मक वाढ न झाल्याने शिक्षण क्षेत्रातील आव्हाने कायम आहेत.

ठळक मुद्देकृष्णा भोगे : रामलाल अग्रवाल यांचा गौरव समारंभ, मान्यवरांची उपस्थिती

जालना : शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली आहे. असे असले तरी गुणात्मक वाढ न झाल्याने शिक्षण क्षेत्रातील आव्हाने कायम आहेत. खऱ्या अर्थाने शिक्षणावर सहा टक्के खर्च करावा, अशी धोरणात्मक तरतूद १९६६ पासून आहे. मात्र, इतक्या वर्षानंतरही हा खर्च केवळ चार टक्क्यापर्यंतच मर्यादीत आहे. कुठलेही शासन असले तरी याकडे लक्ष देत नसल्याची खंत सेवानिवृत्त विभागीय आयुक्त तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक कृष्णा भोगे यांनी व्यक्त केली.जालना येथील इंग्रजीचे गाढे अभ्यासक डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी भोगे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. येथील अग्रसेन फाऊंडेशनमध्ये हा गौरव सोहळा पार पडला. रामलाल अग्रवाल यांनी इंग्रजी साहित्यात दिलेल्या योगदानाची दखल म्हणून येथील आनंद फाऊडेशनच्या वतीने घेण्यात आली. यावेळी अध्यखस्थानी राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे होते. यावेळी विजय बगडीया, अ‍ॅड. सतिश तवरावाला, डॉ. आदीनाथ पाटील, प्राचार्य जवाहर काबरा, प्राचार्य राजेंद्र गायकवाड, प्राचार्य भारत खंदारे, प्राचार्य अनंत चौधरी, प्रा. सुखदेव मांटे, प्रा. संदीप पाटील, मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, प्राचार्य शिवाजी मदन, प्रा. शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलतांना कृष्णा भोगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात सर्वात जास्त अभ्यासक लोक आहेत. तरी देखील समस्या कायम आहे. हे वास्तव स्विकारायला पाहिजे. आज घडीला ७५ टक्क्के महाविद्यालयात तासिका होत नाहीत. शिक्षण संस्थाची भूमिका, प्राध्यापकांची भूमिका आणि पालकवर्गाची भूमिका हे तीनही घटक एकत्र येऊन यावर विचारमंथन होणे गरजेचे असल्याचे भोगे म्हणाले. कार्यक्रमात विविध संस्था, व्यक्तीतर्फे अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रा. दिलीप फोके यांनी मानले.यावेळी यावेळी प्राचार्य रमेश अग्रवाल, प्रा. डॉ. रावसाहेब ढवळे, प्रा. भगवान डोभाळ, प्रा. यशवंत सोनुने, प्रा. संजय लकडे, प्रा. रानमाळ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.गौरव सोहळ्यातून प्रोत्साहान मिळते - रामलाल अग्रवालआदर व्यक्त करणे, गौरव करणे ही प्रथा आजकाल मोडित निघत असतांना आपला गौरव होणे, ही बाब आनंद व समाधान देणारी आहे. ज्यांनी आयुष्याच्या प्रवासात साथ - संगत केली, त्या सर्वांचे आभार व ऋण आपण मनापासून व्यक्त करतो असे सांगून रामलाल अग्रवाल यांनी सविस्तर विचार मांडले.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र