जालन्यात कार चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 14:26 IST2019-02-11T14:26:28+5:302019-02-11T14:26:45+5:30

या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली कार ताब्यात घेतली आहे. 

car thieves arrested in Jalna | जालन्यात कार चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालन्यात कार चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालना : जुना जालन्यातील आनंदनगर येथील अजय जोगदंडे यांची कार (एमएच -01, एनए- 2605) 26 जानेवारी रोजी रात्री चोरीस गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली कार ताब्यात घेतली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, २६ जानेवारीच्या रात्री जुना जालन्यातील आनंदनगर येथील अजय जोगदंडे यांची कार चोरीस गेली होती. ही कार शहरातील शिक्कलकरी मोहल्ल्यातील साल्या-मेहुण्यांनी चोरून नेल्याची माहिती एडीएसला मिळाली होती. एडीएसने आज सकाळी हरदिपसिंग बबलूसिंग टाक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने नवीन मोंढा भागातील निर्जनस्थळी लपवून ठेवलेली सदर कार पोलिसांच्या स्वाधीन केली.

हरदिपसिंग टाक याने कार त्याच्या मेहुण्यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोहवा. एम. बी. स्कॉट, पोना. नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, सचिन आर्य यांनी केली आहे.

Web Title: car thieves arrested in Jalna