शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने विटांचा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

जालना : बीड जिल्ह्यातील परळी येथून विटा घेऊन आलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने दुभाजकावर आदळून ट्रक उलटला. सुदैवाने या अपघातात ...

जालना : बीड जिल्ह्यातील परळी येथून विटा घेऊन आलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने दुभाजकावर आदळून ट्रक उलटला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. ट्रकचालक व क्लिनर सुखरुप बाहेर पडले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मंठा बायपासवरील अंबड चौफुलीपासून काही अंतरावर घडली.

बीड जिल्ह्यातील परळी येथून विटा घेऊन (एमएच १२ एचडी ४३९२) या क्रमांकाचा ट्रक जालन्यात आला. येथील एका व्यावसायिकाला विटा देण्यात येणार होत्या. ट्रक अंबड चौफुलीपासून काही अंतरावर असताना ट्रकचे समोरचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला आणि उलटला. यामुळे नुकतेच तयार करण्यात येत असलेला एका पथदिव्याचा खांबही तुटला आहे.

दरम्यान, मंठाकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रक उलटत असल्याचे पाहून दुचाकी जागीच थांबविल्याने अनर्थ टळला. ट्रक उलटल्यामुळे चाके निखळली व पाटाही तुटला. एवढा भयंकर अपघात असूनही चालक व क्लीनर सुखरूप बाहेर पडले. अपघातानंतर ट्रकमधील संपूर्ण विटा रोडवर पडल्या होत्या. यानंतर काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. परंतु, विटा बाजूला करुन नंतर रस्ता सुरळीत करण्यात आला. दुपारनंतर त्या ट्रकमधील विटा दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून नेण्यात आल्या.

.........फोटो ॲक्सिडेंट