परतूर येथे धनगर समाजाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:00 IST2018-08-03T23:59:39+5:302018-08-04T00:00:00+5:30
धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली.

परतूर येथे धनगर समाजाचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : धनगर समाजाच्या वतिने आरक्षणासाठी उप.विभागीय कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. या दरम्यान खंडोबाराय व वाघ्या मुरळी वरील गितांनी आंदोलनात चांगलीच रंगत आली.
आरक्षण व आपल्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी धनगर समाजाच्या वतिने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कार्याच्या वतिने धनगर समाजाला अनूसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमजबजावणी करण्यात यावी. अहिलादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाला भरीव निधी देण्यात यावा. चौंडी येथील जयंती कार्यक्रमास घोषणाबाजी करणाऱ्या युवकांवर दाखल कलेले गुन्हे शासनाने परत घ्यावेत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार डी. डी. कपाटे यांना देण्यात आले. यावेळी दत्ता कोल्हे, शिवाजी तरवरे, भगवान पाटोळे, सिध्देश्वर घोंगडे, नंदकुमार गांजे, योगेश गायकवाड, तात्या गोरे, लहु गाते, योगेश डोणे, योगेश भले उपस्थित होते.