शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या ७० वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

पोलिसांची मोहीम; १६ हजार रुपयांचा दंड केला वसूल भोकरदन : भोकरदन शहरातील रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर भोकरदन पोलिसांकडून कारवाई ...

पोलिसांची मोहीम; १६ हजार रुपयांचा दंड केला वसूल

भोकरदन : भोकरदन शहरातील रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर भोकरदन पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मागील दोन दिवसांत ७० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील भोकरदन - सिल्लोड, भोकरदन -जाफराबाद व भोकरदन -जालना या रस्त्यांवर वाहनधारक कोठेही वाहने उभी करीत होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. बेशिस्त वाहने उभी करणाºया वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक चर्त्रुभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. नगर परिषदेच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांच्यासह १० ते १५ कर्मचारी दोन दिवसांपासून कारवाई करीत आहेत. वाहन चालकांबरोबरच रस्त्यावर बोर्ड उभे करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ७० वाहनधारकांकडून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सराफा मार्केट, जाफराबाद रोड, सिल्लोड रोड, महात्मा फुले चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. येथील वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ७० वाहनधारकांकडून १६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नये.

चर्त्रुभुज काकडे, पोनि. भोकरदन

फोटो ओळी

भोकरदन शहरातील रस्त्यावर बेशिस्त उभी केलेली वाहने पोलिसांनी उचलून नेली.