शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

वडिलांना न सांभाळणाऱ्या नोकरदार मुलास चपराक; दरमहा ५ हजार देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:26 IST

वडील म्हणतात मुलांच्या नावे जमीन करुन देण्याची चूक करू नका

- फकिरा देशमुखभोकरदन: आरोग्य खात्यात चांगल्या पगारावर नोकरीवर असतानाही वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या मुलास चांगलाच धडा मिळाला आहे. मुलाने दरमहा 5 हजार रुपये वडिलांना द्यावे असा असा महत्वपूर्ण निकाल उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिला. या निकालाने वडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलास चपराक ठरली आहे.

या बाबतची माहिती अशी की, तालुक्यातील हिसोडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच कडूबा सयाजी जगताप यांना सुधाकर, भास्कर, राजू व कैलास अशी चार मुले आहेत. त्यापैकी भास्कर, राजू व कैलास ही तीन मुले शेती करतात. तर सुधाकर हा टाकरखेड ( तालुका  देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ) येथे आरोग्य विभागात शासकीय नोकरी करत आहे. त्यास दरमहा 50 हजार रुपये इतके शासकीय वेतन आहे. कडूबा जगताप यांनी चारही मुलांचे उत्तमप्रकारे पालनपोषण करून वाढवले. त्यांचे थाटामाटात विवाह करून दिले. एवढेच नाही तर आपल्या नावावरील सर्व शेतजमीन त्यांच्या नावावर करून दिली. दरम्यान, सुधाकर याच्याकडे राहणाऱ्या कडूबा यांच्या पत्नीचे एक वर्षांपूर्वी निधन झाले. तर कडूबा जगताप हिसोडा येथे शेती करणाऱ्या मुलासोबत राहतात त्यांचे वय 82 वर्ष आहे. तसेच त्यांना पक्षाघात झालेला आहे. उपचारासाठी त्यांना 25 हजार रुपये आवश्यक आहेत. 

त्यामुळे त्यांनी नोकरीत असलेल्या सुधाकर जगताप याच्याकडून 10 हजार रुपये दरमहा व शेती करणाऱ्या तिन्ही मुलाकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 15 हजार रुपये मिळावे यासाठी आई वडील व जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5 व 9 अन्वये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी सुनावणी घेतली असता शेती करणारे तिन्ही मुले वडील कडूबा जगताप यांना शेतीच्या उत्पन्नातून 6 हजार रुपये देतात असे अर्जदाराने मान्य केले. मात्र, नोकरी असलेला मुलगा सुधाकर जगताप याने वडिलांच्या पालन पोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत एक रुपयाही दिला नसल्याचे अर्जदार कडूबा जगताप यांनी उपविभागीय अधिकारी चोरमारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर २५ एप्रिल रोजी चोरमारे यांनी सुधाकर जगताप याने वडिलांना 5 हजार रुपये खावटी द्यावी असा निर्णय दिला. 

वृद्धावस्थेत आधाराची गरजजन्मदात्या आई-वडिलांना वृद्धावस्थेत खऱ्या आधाराची गरज असते. अशावेळी मुलांकडून दुर्लक्ष केले जाते. 2022 मध्ये 11 व 2023 मध्ये आतापर्यंत 2 अशी 13 प्रकरणे माझ्याकडे दाखल करण्यात आली होती. ते प्रकरणे निकाली काढत जेष्ठ नागरिकांना न्याय देण्यात आला आहे. मुले सांभाळ करीत नसतील पालकांनी तत्काळ संपर्क करावा.- अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी 

जमीन नावावर करू नका काबाडकष्ट करून मुलांना मोठे केले. जमीन त्यांच्या नावे करून दिली. ती चूक कोणी करू नये. तीन मुले सांभाळ करतात. मात्र ज्याला नोकरी लागेपर्यंत सांभाळले त्याने धोका दिला. आज न्याय मिळाला आहे. - कडूबा जगताप

टॅग्स :JalanaजालनाFamilyपरिवारCrime Newsगुन्हेगारी