महसूल पथकावर पाळत ठेवून ३०० ब्रास वाळू चोरी! गोंदी पोलीस ठाण्यात १६ तस्करांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:52 IST2026-03-14T12:51:36+5:302026-03-14T12:52:12+5:30

साडेसात लाखांचा महसूल बुडाला; तहसीलदार विजय चव्हाण यांची आपेगावात धडक कारवाई

300 tons of sand stolen while keeping an eye on the revenue team! 16 smugglers booked at Gondi police station | महसूल पथकावर पाळत ठेवून ३०० ब्रास वाळू चोरी! गोंदी पोलीस ठाण्यात १६ तस्करांवर गुन्हा

महसूल पथकावर पाळत ठेवून ३०० ब्रास वाळू चोरी! गोंदी पोलीस ठाण्यात १६ तस्करांवर गुन्हा

वडीगोद्री (जि. जालना): अंबड तालुक्यातील आपेगाव आणि साष्टपिंपळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररित्या ३०० ब्रास वाळू लंपास करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा महसूल विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात मंगेश माउली चौधरी उर्फ सोनू चौधरी याच्यासह एकूण १६ जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या चोरीमुळे शासनाचा सुमारे ७ लाख ५० हजार ५०० रुपयांचा महसूल बुडाला आहे.

अशी झाली कारवाई
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाने ही कारवाई केली. काही सराईत गुन्हेगार महसूल पथकाचे 'लोकेशन' घेऊन रात्रीच्या वेळी वाळू चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. तलाठी सुनील उबरहंडे व दीपक गवारे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, २ ते ४ मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले.

शेतकऱ्यांचाही सहभाग?
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, काही शेतकऱ्यांनी वाळू चोरीसाठी आपल्या शेतातून रस्ता उपलब्ध करून देऊन या गुन्ह्यात सहभाग नोंदवला आहे. सोनू चौधरी याच्या नेतृत्वाखालील ही संघटित टोळी परिसरात दहशत निर्माण करून वाळू चोरी करत होती.

कठोर कारवाईचा इशारा
तहसीलदार विजय चव्हाण यांनी वाळू माफियांना इशारा दिला आहे की, "अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध आगामी काळात 'मोक्का' (MCOCA), 'एमपीडीए' (MPDA) आणि 'तडीपार' यांसारखी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तसेच, संबंधितांच्या खासगी मालमत्तेवर बोजा टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे."

यांच्यावर गुन्हा दाखल
मंगेश माउली चौधरी रा.आपेगाव,एजाज हारून बेग साष्टपिंपळगाव, सुदर्शन अंकुश शेंद्रे साष्टपिंपळगाव, शहारूक आनवर शेख भांबेरी, राम मोरे पाथरवाला बुद्रुक, विलास खरात गोंदी, समीर हारून बेग साष्ट पिंपळगाव, आल्लमस सैयद साष्ट पिंपळगाव, शाहीद हारून बेग साष्ट पिंपळगाव, ज्ञानेश्वर उडदंगे चंदनापुरी, ज्ञानेश्वर बाबुराव शेंद्रे साष्ट पिंपळगाव, रामेश्वर गौड चंदनापुरी, कृष्णा गोकुळ कट्टे साष्ट पिंपळगाव , संजू उबरे शहागड,  पांडुरंग जाधव राजेश नगर गोंदी, आणि शरद नरके अंबड टाकळी यांचा समावेश आहे.

Web Title : रेत चोरी रैकेट का भंडाफोड़; 300 ब्रास चोरी करने पर 16 गिरफ्तार।

Web Summary : जालना में 300 ब्रास रेत चोरी करने वाले एक रेत चोरी रैकेट का भंडाफोड़ किया गया। मंगेश चौधरी सहित सोलह लोगों पर मामला दर्ज किया गया है। राजस्व का नुकसान ₹7.5 लाख है। किसानों ने अपने खेतों से पहुंच प्रदान करके चोरी में मदद की। सख्त कार्रवाई का वादा किया गया है।

Web Title : Sand theft racket busted; 16 booked for stealing 300 brass.

Web Summary : A sand theft racket stealing 300 brass of sand was busted in Jalna. Sixteen individuals, including Mangesh Choudhary, are booked. Revenue loss amounts to ₹7.5 lakhs. Farmers aided the theft by providing access through their fields. Strict action is promised.