जालन्यात कारमधून रिव्हॉल्वरसह 2 लाखाची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:59 IST2019-03-30T18:58:21+5:302019-03-30T18:59:10+5:30
रिव्हॉल्व्हरसोबत 9 जिवंत काडतुसे आणि एक रिकामे(वापरलेले) आढळून आले.

जालन्यात कारमधून रिव्हॉल्वरसह 2 लाखाची रोकड जप्त
जालना : वरुडी फाट्यावर तैनात महसूल व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संयुक्त कारवाई करत एका कारमधून रिव्हॉल्वरसह 2 लाखाची रोकड जप्त केली.
जालना येथील कांचननगर भागातील विजय गव्हाणे पोलिसांच्या ताब्यात.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरुडी फाट्यावर महसूल विभाग आणि पोलिसांचे एक संयुक्त पथक तैनात आहे.या पथकामार्फत जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेऊन कसून चौकशी करण्यात येत आहे. आज या पथकाने एमएच- 21, एबी-9000 या कारची झडती घेतली असता, कारमध्ये एक रिव्हॉल्व्हर आणि रोख 2 लाख 10 हजार रुपये आढळून आले. रिव्हॉल्व्हरसोबत 9 जिवंत काडतुसे आणि एक रिकामे(वापरलेले) आढळून आले.
विशेष म्हणजे सर्व परवानाधारकांनी आपली शस्त्रे जमा केलीली असताना कारचालकांनी आपले रिव्हॉल्व्हर अद्याप जमा केले नव्हते.याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर यांच्यासह पथक प्रमुख रोहिदास राठोड, गणेश पल्लये, पोना. एस.एस. मंडलिक, पोकाँ. के.डी. बिऱ्हाडे, संजय सोनवणे यांनी कामगिरी केली आहे.बदनापूरचे तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.